Site icon कार्यारंभ लाईव्ह

महिलांना आम्ही 3000 रुपये देणार – जयंत पाटील

mohan jagtap,jayant patil

mohan jagtap,jayant patil

मोहन जगताप mohan jagtap यांच्या प्रचारसभेत जयंत पाटलांनी दिले अश्वासन


प्रतिनिधी । वडवणी
दि.12 : महागाई तर प्रचंड वाढली आहे. मागच्यावेळी 20 हजारात होणारी दिवाळी आता 30 रुपयांत झाली असेल. महाराष्ट्राच्या अनेक भागात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. ते थांबविण्यासाठी एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे सरकार आपल्याला खाली खेचायचे आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर महिलांना एसटीचा प्रवास मोफत करणार आहोत. सुशीक्षीत बेरोजगारांना 4000 रुपये आम्ही देणार आहोत. महिलांना आम्ही दर महिन्याला तीन हजार रुपये देणार. शेतकर्‍यांचे कर्ज 3 लाखापर्यंतची कर्ज माफ करून आणि गरज पडली तर तीनाचे चार लाख माफ करण्याचा निर्णय घेऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

ते वडवणीत माजलगावचे उमेदवार मोहनदादा जगताप यांच्या प्रचारसभेत सोमवारी रात्री झालेल्या सभेत बोलत होते. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, भारतात सर्वात उत्तम कोविड प्रशासन उध्दव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात चालिवण्यात आलं. त्याची दखल जगाने घेतली. पण एवढं चांगलं सरकार त्यांनी पाडलं. कारण त्यांना महाराष्ट्र ताब्यात घ्यायचं होतं. परिणाम काय झाला? महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला गेले. त्यामुळे गुजरात राज्यातील लोक श्रीमंत होत आहेत आणि महाराष्ट्र तसाच गरीब होत आहे. आमच्या पोरांच्या हाताला काही काम नाही, दुसर्‍या बाजुने आमचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काही करत नाहीत. देशाच्या दुतावासात जर कोणी परदेशी गुंतवणूकदार आला तर त्यांना तिथेच मुंबई ऐवजी गुजरातला जाण्याचा सल्ला दिला जातो, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

2 हजारची नोट डब्यात टाकून द्या – मोहन जगताप
माजलगावचे शरद पवार गटाचे उमेदवार मोहनदादा जगताप म्हणाले, जशी मोदींनी 2 हजारांची नोट बंद करून डब्यात टाकली त्याप्रमाणे 20 वर्ष माजलगाव मतदारसंघाचे राजकारण करणारे 2000 च्या नोटेसारखी डब्यात बंद करायची वेळ आली आहे. राजकारणात बेबनाव करण्याचे काम केले तर ते टिकत नाही. वडवणीत विद्यमान आमदारांनी निवडणूक पुर्व अनेक उद्घाटने केली. वडवणीत एमआयडीसीचे देखील स्वप्न दाखवले. त्यांना माजलगावची एमआयडीसी पूर्ण करता आली नाही ते आता वडवणीत एमआयडीसी करणार आहेत म्हणे. जे साधे वडवणीचे एसटी स्टॅन्ड करू शकले नाहीत ते वडवणीचा काय विकास करणार? मी जात पात न बघणारा माणूस आहे. छत्रपती कारखाना उभा करण्यात माझा 15 वर्षे वनवास झाला. पण शेवटी छत्रपती कारखाना उभाच राहीला. पुतण्याला वारस म्हणून फिरवले. पुन्हा म्हणले आता मलाच पाहिजे. गेल्यावर्षी म्हणाले माझी ही शेवटची निवडणूक आहे. पण मतदारांनी मला आशीर्वाद दिला तर पुन्हा ह्यांचा वारस या राजकारणात दिसू देणार नाही, असे देखील मोहनराव जगताप म्हणाले.

Exit mobile version