Site icon कार्यारंभ लाईव्ह

नोव्हेंबर पर्यंत मोफत धान्य देणार-मोदी

modi

बीड : अनलॉक-2 मध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये जसे सतर्क होतो तसेच पुढेही राहण्याची गरज आहे. आता पुढे गणेशोत्सव, दसरा, दिवळी असे अनेक सणउत्सव आहेत. देशामध्ये एकही गरीब उपाशी झोपला नाही पाहिजे. यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरु करण्यात येणार आहे.

या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे पाच महिने 80 कोटी जनतेला प्रत्येक महिन्याला पाच किलो गहू व पाच किलो तांदुळ मोफत देण्यात येणार आहे. प्रत्येक परिवाराला दर महिन्याला एक किलो दाळ दिली जाणार आहे. यावर 90 हजार कोटी पेक्षा अधिक खर्च केला जाणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. वेळेवर लॉकडाऊन केल्यामुळे लाखो नागरिकांचा जिव वाचला आहे. यापुढे नागरिकांनी फक्त नियमाचं पालन करावं असेही अवाहन यावेळी त्यांनी जनतेशी केले आहे.

 

एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपुरकडे प्रस्थान

कार्यारंभचा ई-पेपर वाचण्यासाठी क्लिक करा…

Exit mobile version