Site icon कार्यारंभ लाईव्ह

केरळमध्ये विमान धावपट्टीवर येताच त्याचे दोन तुकडे

keral viman durghatana

keral viman durghatana

दुर्घटनेनंतर विमान दरीत जाऊन कोसळलं

कोळीकोड, दि.7 : केरळच्या कोळीकोडमध्ये एअर इंडिच्या विमानाला अपघात झाला आहे. विमान लँड करताना ते रन वे सोडून पुढे गेल्याचं हा अपघात झाला असून यात पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती केरळचे कॅबिनेट मंत्री के राजू यांनी दिली आहे. या विमानात 191 प्रवासी आहेत. एअर इंडियाचं हे विमान दुबईहून आलं होतं, असं एअर इंडियानं सांगितलं आहे. बोईंग 737 प्रकारचं हे विमान करुपूर धावपट्टीवर संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी लँड करत होतं. त्यावेळी हे विमान धावपट्टीवरून घसरलं.


घटनास्थळाकडे किमान 24 रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या काही गाड्या तात्काळ रवाना झाल्याची माहिती आहे. विमानाचे दोन तुकडे झाल्याचं समजतंय या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जातेय. एअर इंडियाने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार विमानात 174 प्रवासी होते आणि 6 क्रू मेंबर्स होते, ज्यात दोन पायलट्सचाही समावेश होता. विमान रनवेवर उतरल्यानंतर शेवटपर्यंत गेलं आणि त्यानंतर व्हॅलीतून खाली पडलं. त्यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले.त्यानंतर ते तसेच पुढं गेलं आणि दरीत पडलं.

Exit mobile version