Site icon कार्यारंभ लाईव्ह

भूमिपूजनाला मोदींसोबत मंचावर उपस्थित राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख कोरोना पॉझिटिव्ह

ram mandir bhumi pujan

ram mandir bhumi pujan

दिल्ली : रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्ट रोजी पार पडला. हा सोहळा कोरोना पार्श्वभूमीवर  व्हावा कि नाही, यावर अनेक मतमतांतरे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात होती. त्याच अनुषंगाने हा सोहळा होणार कि नाही यावरही चर्चा झाल्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आता आयोध्येतून येणारी बातमी फार काही बारी नाहीये.

अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण झाली आहे. चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास हजर होते. यावेळी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संपर्कात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे.

५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. करोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांनाच कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. मंचावरही फक्त पाच लोकांनाच परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते.

मंचावर महंत नृत्यगोपाल दास आणि नरेंद्र मोदी यांच्यासहित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. सरसंघचलाक मोहन भागवत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या.

Exit mobile version