Site icon कार्यारंभ लाईव्ह

म्हशीला कोणीतरी करणी केली म्हणत शेतकरी ठाण्यात घेऊन आला म्हैस

MHAIS

MHAIS

भिंड, दि. 13 : आपल्या म्हशीला कोणीतरी करणी केली आहे, त्यामुळे तिने दूध देणे बंद केले, अशी तक्रार घेऊन एक शेतकरी थेट आपल्या म्हशीला घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाला. शेतकर्‍याच्या या विचित्र तक्रारीनंतर पोलीसही हैरान झाले. ही घटना मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या शेतकर्‍याने एक संशय व्यक्त केला आहे. म्हशीवर कोणीतरी काळी जादू केल्यामुळे तिने दूध देणं बंद केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. शेवटी हा शेतकरी मदतीसाठी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


पोलीस अधिक्षक अरविंद शाह यांनी सांगितलं की, बाबुलाल जाटव (45) यांनी शनिवारी नयागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची म्हैस गेल्या काही दिवसांपासून दूध देत नसल्यामुळे शेतकरी चिंतित आहे. शेतकर्‍याने सांगितलं की, काही गावकर्‍यांनी शेतकर्‍याला सांगितलं की, म्हशीवर कोणीतरी जादूटोना केला आहे. यानंतर शेतकरी म्हशीला घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. आणि पोलिसांकडे मदतीचं आवाहन केलं होतं.


यावर पोलिसांनी पशूच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना दिली. त्यानंतर आज गावकरी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांचे आभार मानू लागले. कारण रविवारी सकाळी म्हशीने दूध दिल्यामुळे शेतकर्‍याची चिंता मिटली आहे.

Exit mobile version