मुंबई, दि.17 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. परभणी आणि गोंदिया जिल्ह्याचे पालमंत्री पदाचा पदभार इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय झाला. त्यात परभणीचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे तर गोंदियाची जबाबदारी प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील बैठकीत सध्या अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित मोठे निर्णय पक्षाने घेतले आहेत. आघाडी सरकारने मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नसला तरी देखील त्यांच्याकडे असलेल्या विभागाचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच मलिक यांच्याकडील परभणी आणि गोंदिया या जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे देखील इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्ण घेतला आहे. या निर्णयानुसार, मलिकांकडे असलेले परभणीचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर पाटील हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
धनंजय मुंडेंकडे परभणीचे पालकमंत्रीपद

dhananjay munde