Site icon कार्यारंभ लाईव्ह

सिध्देश्वरचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरूजींना अटक

SIDHESHWAR VIDYALAY MAJALGAON

SIDHESHWAR VIDYALAY MAJALGAON

प्रतिनिधी । माजलगाव
दि.15 : येथील भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिद्धेश्वर विद्यालयात मंगळवारी प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेताना रंगेहाथ पकडलेल्या दोन शिक्षकांना बुधवारी माजलगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. दरम्यान अटकेतील दोन शिक्षकांनी दिलेल्या जवाबानुसार आता पोलसांनी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव दगडू आडे व एका खाजगी इसम विक्रम पांडे यांस आज अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डोनेशन ते घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे पालकांनी केल्यानंतर मंगळवारी आमदार सोळंके यांनी अधिकार्‍यांना सोबत घेऊन स्टिंग ऑपरेशन केले. त्यावेळी वैष्णवी मंगल कार्यालयात सिद्धेश्वर विद्यालयाचे तीन शिक्षक विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या नावावर पैसे घेत असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांच्याकडून 1 लाख 76 हजार रुपये व कागदपत्रे जप्त करण्यात आली. तीन शिक्षकांपैकी एक शिक्षक यावेळी तेथून पळून गेले तर दोघा शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बुधवारी सदाशिव ढगे व परमेश्वर आदमाने या शिक्षकांना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस. गोसावी यांनी त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली. तर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे व खासगी इसम विक्रम पांडे यांना आज अटक केली.

शिक्षकांचे काम बंद आंदोलन

दोन शिक्षक व मुख्याध्यापक यांना या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले असून मुख्य सूत्रधार मोकळा आहे. त्यामुळे त्यास ताब्यात घेण्यात यावे, अन्यथा शिक्षक आजपासून कामबंद आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याची माहिती सिध्देश्वर विद्यालयातील एका शिक्षकाने दिली.

Exit mobile version