Site icon कार्यारंभ लाईव्ह

ऊसतोड मजुरांचा ट्रॅक्टर घाटात पलटी; एकाचा मृत्यू

येल्डा मार्गावरील घटना

अंबाजोगाई : ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर घाटात पलटी झाला. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. तर आठ ते दहा जणांना किरकोळ मार लागला आहे. ही घटना तालुक्यातील येल्डा ते मुकुंदराज घाटात आज (दि.३०) सकाळी ६ वाजता घडली.

रणजित अमोल कांबळे (वय ११) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. येल्डा (ता.अंबाजोगाई) येथील ऊसतोड मजूर टॅक्टरमधून पहाटेच्या सुमारास कारखान्याकडे जात होते. टॅक्टरचा रॉड तुटल्याने ट्रॉली मुकुंदराज घाटाच्या अलीकडे पलटी झाली. यात एका मुलाचा जागीच मृत्यु झाला. इतर जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, नायब तहसिलदार मिलिंद गायकवाड, वरिष्ठ लिपिक नाना गायकवाड, सचिन अंजान, वरिष्ठ लिपीक शेख अन्वर, सारंग पुजारी यांच्या सहकार्यामुळे तत्काळ मदत व सहकार्य मिळाले.

Exit mobile version