Site icon कार्यारंभ लाईव्ह

दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली, उद्या दुपारी जाहीर होणार निकाल SSC RESULT 2023

10th result

SSC result

पुणे, दि.1 : दहावीच्या SSC RESULT 2023 निकालाची धाकधूक असणार्‍या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.

नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे आता दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले होते. उद्या दुपारपर्यंत त्यांची उत्सुकता ताणली जाणार आहे.

Exit mobile version