Site icon कार्यारंभ लाईव्ह

पंकजाताईंच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा करेक्ट कार्यक्रम करायचाय – बाबरी मुंडे

babari munde

babari munde

बाबरी मुंडेंच्या रॅली अन् प्रचार सभेस प्रचंड प्रतिसाद

प्रतिनिधी । माजलगाव
दि.11 : लोकसभेत पंकजाताई मुंडे pankajatai munde यांच्यासोबत राहून त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे सगळे जण माझ्या विरोधात उभे राहीलेले आहेत. आमच्या पाच प्रमुख उमेदवारांपैकी एकट्या बाबरी मुंडेंनी पंकजाताई मुंडे यांचे इमानदारीने काम केले आहे. बाकी सगळ्यांनी ‘तुम्हाला काय करायचे ते करा’, असे म्हणत पंकजाताईंना असहकार्य करण्याची पडद्यामागून भुमिका घेतली होती. त्यामुळे ह्या सगळ्या गद्दारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. सर्व मतदार बंधू आणि भगीनींनी मला सहकार्य करावे, असे अवाहन अपक्ष उमेदवार बाबरी मुंडे यांनी केले.




बाबरी मुंडे यांनी आज माजलगावात प्रचंड मोठी रॅली काढत मोंढा मैदानावर सभा घेतली. यावेळी ओबीसीच्या नेत्या संजीवनी राऊत, राजेभाऊ मुंडे, महादेव तोंडे, शिवाजी मुंडे, दिलीप बडे, मीरा गांधले यांची प्रमुख उपस्थिती होती. अतिशय आक्रमकपणे बोलताना बाबरी मुंडे म्हणाले की, लोकसभेला महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारसभेत सोबत राहीले. पण अंधारात येऊन आमचं कोणी ऐकत नाही असे पंकजाताईंना सांगितले. आणि मतदान मागताना तुम्हाला काय करायचे ते करा अशी भुमिका या सगळ्यांनी घेतली होती. त्यामुळेच पंकजाताई मुंडे यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला असा आरोप बाबरी मुंडे यांनी केला. खासकरून त्यांचा रोख आ. प्रकाश सोळंके, माधव निर्मळ, रमेश आडसकर यांच्यावर होता. विद्यमान आ. सोळंके यांच्यावर टिका करताना बाबरी मुंडे म्हणाले, एमआयडीसीमध्ये एकही उद्योग न आणता कागदोपत्री काम करून माजलगाव मतदार संघ भकास करण्याचे काम केले आहे. शंभरपैकी 95 गावात आजही रस्ते नाहीत. त्यामुळे कुठपर्यंत प्रस्थापित लोकांच्या पाठीमागे राहणार आहात. कुठपर्यंत ह्यांची गुलामीगिरी करणार आहात? त्यामुळे आता गोरगरीबांनी आठरापगड जातीचा माणूस म्हणून माझ्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन बाबरी मुंडे यांनी केले आहे.

आपली लढाई विस्थापितांची
स्व.गोपीनाथ मुंडेंनी आणि पंकजाताई मुंडेंनी कुठलीही जातपात न पाहता उमेदवार दिले. आम्ही त्या उमदेवाराची जात काय हे न पाहता आम्ही त्या उमेदवाराचे काम केले. आता आपली लढाई विस्थापितांची आहे, समोर सगळे प्रस्थापित आहेत.

ही निवडणूक जिंकण्यासाठी लढवतोय
कोणी म्हणतोय हा बाबरी रमेश आडसकरांनी उभा केलाय. कोणी म्हणतंय प्रकाश सोळंकेंनी कोणी म्हणतंय मोहन जगतापने. पण त्या सगळ्यांना सांगतो, ही निवडणूक मी फक्त जिंकण्यासाठी लढतोय. आम्हाला विनाकरण खवळू नका, असेही बाबरी मुंडे म्हणाले.

नवरदेव फिरवून फिरवून आपटीला
जो माणूस घरच्यांचा होऊ शकत नाही, जो माणूस पुतण्याचा होऊ शकत नाही, तो माणूस पुतण्याचा काय होणार आहे? त्या पुतण्याला ह्यांनी नवरेदव म्हणून सजवून सगळीकडे फिरवले आणि आता फिरवून फिरवून आपटीले, अशी टिका बाबरी मुंडे यांनी केली.

माजलगाव धरणाला स्व.वसंतरावांचे नाव का नाही?
माजलगाव धरणाला स्व. वसंतराव नाईक यांचे नाव द्या म्हणून किती दिवसांपासून मागणी आहे पण तुम्ही का दिले नाही? तुम्हाला फक्त बंजारा समाज, धनगर समाज मतांसाठीच लागतो का? असा सवाल बाबरी मुंडे यांनी केला.

Exit mobile version