Site icon कार्यारंभ लाईव्ह

कोरोनावरील औषध रामदेवबाबा आज जगासमोर आणणार

कोरोनावरील औषध रामदेवबाबा आज जगासमोर आणणार
नवीदिल्ली:
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला होता. आज पतंजलीचं करोनावरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदीक औषध जगासमोर येणार आहे. आचार्य बालकृष्ण हे दुपारी १२ वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच करणार आहेत. बाबा रामदेवही यावेळी उपस्थित राहणार आहेत.


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध शोधल्याचा तसंच ते प्रभावीदेखील ठरत असल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला होता. पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी हे औषध तयार केलं आहे. तसंच आज लाँचदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण हे वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यातील निकाल सर्वांसमोर ठेवणार आहेत. सध्या या औषधाचं उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहेत.

दरम्यान, पतंजलीला मिळालेल्या परवानगीनंतर या औषधाची वैद्यकीय चाचणी इंदूर आणि जयपूरमध्ये करण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर पतंजलीची एक टीम यावर संशोधन करत होती, अशी माहिती बालकृष्ण यांनी दिली. याव्यतिरिक्त अनेक करोनाबाधितांवर या औषधाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तसंच यामध्ये १०० टक्के यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. कोरोनील हे औषध करोनाबाधितांना ५ ते १४ दिवसांमध्ये बरं करू शकतं असा दावाही बालकृष्ण यांनी केला आहे.

Exit mobile version