न्यूज ऑफ द डे

खा.शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात

By Karyarambh Team

June 29, 2020

पुणे : पुण्याहून मुंबईत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांच्या ताफ्यातील गाडी अचानक पलटल्याने झालेल्या अपघातात accident एक पोलीस जखमी झाला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्याहून मुंबईला mumbai येत होते. त्यावेळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने येत होता. बोरघाटाजवळ अमृतांजन पुलानजीक पवार यांच्या ताफ्यातील पोलिसाची गाडी अचानक स्लीप झाली आणि पलटी झाली. त्यामुळे तात्काळ गाड्या थांबवून या गाडीतील सर्व पोलिसांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात एका पोलिसाला किरकोळ मार लागला असून गाडीचं थोडं नुकसान झालं आहे. पवार यांची गाडी पुढे होती आणि पलटी झालेली गाडी पाठीमागून येत होती. त्यामुळे पवार यांच्या गाडीला काहीही झालेलं नसून पवार सुखरूप safe आहेत.

 

रात्रीतून सरकार स्थापण्याचा निर्णय चुकलाच : देवेंद्र फडणवीस

गोदापात्रातून वाळू तस्करी; दोन ट्रॅक्टरसह जेसीबी जप्त