Site icon कार्यारंभ लाईव्ह

भारताची पहिली लस मानवी चाचणीसाठी तयार!

bharat biotech

india first vaccine bharat biotech

पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका या सारख्या व्हायरसवर कंपनीने लस बनविलेली आहे.

हैदराबाद, दि.30 : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावरील लस विकसीत करण्याच्या कामाला लागले असतानाच भारतातही ते काम प्रगतीपथावर होते. आज त्या संदर्भात एक खुशखबर ‘भारत बायोटेक’ कंपनीनं दिली आहे. या कंपनीने कोरोना या विषाणूवरील देशातील पहिली लस बनवण्यात यश मिळवले आहे.

या लसीची मानव चाचणी घेण्यासाठी आता सरकारकडूनही परवानगी देण्यात आली आहे. या कंपनीला या आधीही अनेक विषाणूंवरील लस बनविण्यात यश आले आहे.


कोरोनावरील लसीच्या चाचणीची सुरूवात जुलैपासून सुरू होईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. भारत बायोटेक या कंपनीला आजतागायत पोलिओ polio, रेबीज rabies virus, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका zika यांसारख्या दुर्धर आजारांवर लस बनवण्यात यश मिळालं आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवरील देशातील ही पहिली लस ठरली असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. हैदराबाद शहरातील एका सुरक्षित लॅबमध्ये ही लस बनवण्यात आली आहे. लसीची मानवी चाचणी घेण्याची परवानगी भारत बायोटेकला सोमवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Exit mobile version