Site icon कार्यारंभ लाईव्ह

चीनमध्ये सरकारविरोधात असंतोष; सैन्यच करणार सत्तापालट

सरकार

china army fights back against their सरकार

सरकारी निर्णयामुळे भावना दुखावल्या

दि.2 ः चीन भारतावर कितीही आक्रमण करून जगासमोर महासत्ताक असल्याचा दावा करत असला, तरीही चीनच्याच दिव्याखाली अंधार असल्याने चीन तोंडघशी पडतोय. चीनने गलवान खोर्‍यात भारताशी चकमक करून त्याचे 40 सैनिक गमावले आहेत. मात्र, चीनमध्ये सध्या कार्यरत असलेले कम्युनिस्ट सरकार हे हि माहिती आणि गमावलेल्या सैनिकांचे आकडे लपवल्यामुळे अडचणीत आले आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मीचे माजी अधिकारी आणि विद्यमान सैनिकांत याच गोष्टीवरून नाराजी वाढत असल्याचं दिसून येत आहे. तसंच ते कोणत्याही क्षणी सरकारविरोधात सशस्त्र आंदोलन करू शकतात अशा शक्यता आता वर्तवण्यात येत आहेत.

वॉशिंग्टन पोस्टच्या ओपिनिअनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या माजी नेत्याचे पुत्र आणि चीनच्या सिटीझन पॉवर इनिशिएटिव्हचे अध्यक्ष जियानली यांग यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पीएलए चीनच्या सत्तेतील मुख्य भाग राहिला आहे. जर देशसेवेत काम करणार्‍या पीएलए केडरच्या भावना दुखावल्या गेल्या तर ते सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांमध्ये सामील होतील आणि देशाच्या सरकारविरूद्ध बंडखोरी करतील, असं यांग यांनी म्हटलं आहे.

सरकारने आपले प्राण देशासाठी पणाला लावलेल्या सैनिकांना देखील योग्य मानसन्मान दिला नाही. उलटपक्षी भारताने आपल्या शहिदांविषयी आदरभावना व्यक्त करून, भारतीय नागरीकांना सर्व माहिती उपलब्ध करून दिली.

जर आपले अधिक सैनिक ठार झाले हे सरकारनं मान्य केलं तर देशांत अशांतता पसरेल आणि सीपीपीच्या सत्तेलाही धोका निर्माण होऊ शकतो या भितीपोटी चिनी सरकारने हि माहिती लपवल्याचा दावा यांग यांनी केला आहे.

भारताबरोबर झालेल्या चकमकीबाबात चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांना किती सैनिक मारले गेल्याचं विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे माहिती नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी भारतीय माध्यमांचा हवाला दिला. यात चीनचे 40 सैनिक ठार झाल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांनी ती चुकीची माहिती असल्याचं दुसर्‍या दिवशी सांगितलं. अशा गलथान कारभारामुळे चीनमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे आणि याचा तोटा चीनच्या विद्यमान सरकारला नक्कीच होणार आहे.

Exit mobile version