Site icon कार्यारंभ लाईव्ह

अपरहण करुन डांबून ठेवत चौदा दिवस केले अत्याचार

atyachar

atyachar

गुन्हा दाखल आरोपी फरार

परळी : महिलेचे अपहरण करून चौदा दिवस डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना परळी शहरात घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

      याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की येथील शादाब खान (रा.बंगला गल्ली ता.परळी) याने 43 वर्षीय महिलेचे अपहरण करून 14 दिवस डांबून ठेवत तिच्यावर सतत बलात्कार केला व महिलेच्या बोटातील 4 ग्रामची अंगठी काढून घेतली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपी शादाब खान यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 208 /2020 कलम 376, 365, 386 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून जिल्ह्यातील महिला असुरक्षित असल्याचे या घटनेवरून सिद्ध होत आहे.

Exit mobile version