Site icon कार्यारंभ लाईव्ह

बाप-लेकाच्या भांडणात मुलाचा मृत्यू

khun

khun

विडा येथील घटना

केज : तालुक्यातील विडा या गावी क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाप लेकाच्या भांडणात मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली.

या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा

तालुक्यातील विडा येथील भागवत जाधव व त्यांचा मुलगा अण्णा जाधव यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वारंवार तक्रारी होत असत. मात्र शुक्रवारी 4.30 च्या दरम्यान दोघांचे भांडण टोकाला गेले अन दोघात दगडाने एकमेकांवर प्रहार करत हाणामारी झाली. यामध्ये अण्णा जाधवच्या डोक्यात दगड लागल्याने गंभीर जखमी झाल्याचे पाहून बाप पळून गेला. मात्र गावातील काही लोक अण्णा यास एका गाडीत दवाखान्यात घेऊन गेले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. बाप मात्र रक्ताने माखलेल्या अवस्थेत पळून गेल्याचे समजते. केज पोलीस ठाण्याचे एपीआय श्री. मिसळे, बिट अंमलदार श्री.मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Exit mobile version