Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा : आजही 113 जण पॉझिटिव्ह

CORONA

CORONA

बीड, दि.7 : बीड जिल्ह्यात आजही 113 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात बीड तालुक्यात 20, अंबाजोगाई 22, परळी 28, केज 24, धारूर 1, माजलगाव 5, शिरूर 2, आष्टी 1, गेवराई 10 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. आज प्राप्त झालेल्या 652 पैकी 532 निगेटिव्ह तर 7 अनिर्णित आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेले रिपोर्ट पहा

1
2

जिल्हा अपडेट 7 ऑगस्ट
एकूण रुग्ण – 1382
मयत – 43
अ‍ॅक्टिव रुग्ण – 765
बरे झालेले- 574
खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिगृहीत
बीड शहरातील कोविड रुग्णांची संख्या दिवसें दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांची आयएमए संघटना बीड शाखा यांच्या सहकार्याने खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांच्या सेवा उपलब्ध होणार असून जिल्हा कोविड रुग्णालय, बीड येथे पुढील 15 दिवसांसाठी हे डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्णवेळ उपस्थित राहतील
यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश पारीत केले आहेत. यामुळे कोविड रुग्णालय बीड येथे सेवा देण्यास पुढे आलेले खाजगी वैद्यकिय व्यायसायीकयांच्या सेवा पुढील 15 दिवसांसाठी अधिगृहित केलेल्या असून खाजगी वैद्यकिय व्यावसायीक तेथे सेवा देतील. कोव्हीड-19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने सदर कार्यवाही केली जात आहे

Exit mobile version