beed city before lockdown

कोरोना अपडेट

बीड शहरात खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी

By Karyarambh Team

August 11, 2020

बीड, दि.11 : आज रात्री 12 ते 21 ऑगस्टपर्यंत बीड शहरासह अन्य शहरांमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे खरेदी करण्यासाठी नागरिकांचा आजचाच वेळ असल्याने त्यांनी बाजारपेठेत तुडूंब गर्दी केली आहे. प्रशासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील नगर रोड, सुभाष रोड, जालना रोड, पांगरी रोड, साठे चौक, आबेंडकर चौक, जुना मोंढा, मोंढा रोड, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, बशीर गंज, माळीवेस, बसस्टॅन्ड पाठीमागील रस्ता, अंबिका चौक, भागात पायी, दुचाकी, फोरव्हिलर घेऊन नागरिक घराच्या बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे सगळे रस्ते जाम झाले आहेत. नागरिकांच्या या रिस्की वागणुकीमुळे बीडमध्ये पुढील काळात कोरोनाचं मोठं संकट घोंघावणार आहे. विशेष म्हणजे शहरातील तीन दिवस केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 354 व्यापारी, विक्रेते व तत्सम लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरातील नागरिकांना हे माहित असताना देखील त्यांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस जिल्हाधिकार्‍यांनी पुकारलेल्या लॉकडाऊनचा कितपत परिणाम दिसून येईल हे पुढच्या पंधरा दिवसात कळेल.

बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण- 2048बरे झालेले रुग्ण – 805एकूण मृत्यू- 51उपचार सुरु- 1192

बीड- बीड बसस्थानकामागील हा रस्ता एरव्ही मोकळा असतो. परंतु ऐन लॉकडाऊनच्या एक दिवस आधी या रस्त्यावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती.

पोळा, दहीहंडीसाठी जिल्हाधिकार्‍यांचे नवे आदेश

कालच्या 230 कोरोनाग्रस्तांचा तपशील जाहीर https://karyarambhlive.com/news/3192/

बीडसह अंबाजोगाई, केज, माजलगाव, परळी व आष्टी ही बंद करण्याबाबतचा निर्णय झाला आहे. पण आता उर्वरित ग्रामीण भागही बंद करण्याबाबत चर्चा झाली आहे. जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोठी मोठी देश कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हरतर्‍हेचे प्रयत्न करीत असताना छोट्याश्या न्युझीलंडने मात्र कोरोनावर पुर्णपणे विजय मिळवला. मागील 100 दिवसात आता या देशात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. न्युझीलंडने हे कसं शक्य करून दाखवलं यासाठी क्लिक करून वाचा…https://karyarambhlive.com/news/3176/