Site icon कार्यारंभ लाईव्ह

मेरिटमध्ये आलेल्या महाविद्यालयीन मुलीचा बुडून मृत्यू

budun mrutyu

budun mrutyu

धारूर, दि.13 : तालुक्यातील गावंदरा गावाजवळील तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या प्रीती दत्तात्रय घुले (वय 18 वर्षे) या मुलीचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
सकाळी घरचे काम उरकल्यानंतर गावाच्या पुर्वेस असणार्‍या साठवण तलावात प्रिती घुले कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी पाण्यात घसरून पडल्याने तिला पोहता आले नाही. सोबत गेलेल्या मुलीने आरडा ओरडा केल्यानंतर तलावालगत शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी धाव घेतली. तिला बाहेर काढण्यात आले परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. प्रिती घुले हीला दहावीत 96 टक्के मार्क मिळाले होते. या वर्षी ती 12 वी विज्ञान शाखेला शिकत होती. तिच्या मृत्यू मूळे हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रितीचे मोठे बंधू डॉ.अरूण घुले, बहिण डॉ.ज्योती घुले, आई पुष्पा घुले असा परिवार आहे. या घटनेसंदर्भात धारूर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत कोणतीच नोंद झालेली नव्हती.

Exit mobile version