Site icon कार्यारंभ लाईव्ह

महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांना धक्का

dhoni

dhoni

मुंबई: भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याच्या खेळाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. धोनीने या सगळ्यांना धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅच खेळताना आता त्याचे चाहते पाहू शकणार नाहीत आणि याचे नक्कीच त्यांना दुःख आहे.

मात्र धोनीची जादू कायम राहणार एवढे नक्की. धोनीचे करियर हे अत्यंत कौतुकास्पद राहिले आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी त्यांचे भारतीय क्रिकेट मधील योगदान कधीही विसरू शकणार नाहीत.

Exit mobile version