Site icon कार्यारंभ लाईव्ह

धनंजय मुंडेंबाबत तत्काळ निर्णय घेऊ : शरद पवार

Sharad Pawar

Sharad Pawar

मुंबई : गायिकेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे. मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. आता पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असं शरद पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले की, धनंजय मुंडेंनी काल माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांची बाजू सविस्तर मांडली. त्यांचा काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध आला. आता त्याबद्दल पोलीस ठाण्यात काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणावरून व्यक्तिगत स्वरुपाचे हल्ले होणार याची बहुधा त्यांना पूर्वकल्पना असावी. त्यामुळे ते आधीच कोर्टात गेले. त्यामुळे कोर्टाच्या विषयावर मी बोलणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं. दरम्यान, पवारांचा बोलण्याचा रोख पाहता राजीनामा घेण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तविली आहे.

Exit mobile version