चेन्नई, दि. 4 : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड झाल्याचे पहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललीता यांच्या मैत्रीण व्ही.के. शशीकला यांनी तुरुंगातून बाहेर येताच राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. सहा एप्रिल रोजी तामिळनाडूत निवडणुका होत आहेत. एमके स्टालिन यांचा पक्ष द्रमुक सत्तेत येऊ नये याची काळजी घ्यावी असे अवाहन देखील शशीकला यांनी केले आहे.
एमके स्टालिन यांचा पक्ष डीएमके सत्ताधारी एआयएडीएमके-भाजप युतीच्या विरोधात लढत आहे. निवडणुकीत डीएमकेने काँग्रेस व इतर पक्षांशी युती केली आहे. शशिकला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, जया (माजी मुख्यमंत्री जे जयललिता) जिवंत असतानाही मी कधीही सत्ता किंवा पदावर नव्हते. तिच्या मृत्यूनंतरही मी तसे करणार नाही. राजकारण सोडत असले तरी त्यांचा पक्ष विजयी झाला पाहिजे आणि त्यांचा वारसा पुढे जाईल अशी मी प्रार्थना करते. मला कधीही सत्ता, अधिकार किंवा संपत्तीची इच्छा नव्हती. अम्मा (जयललिता) आणि तमिळनाडूच्या जनतेचे मी नेहमी कृतज्ञ आहे.
व्ही. के. शशिकला यांना 28 जानेवारी रोजी एका बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात चार वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आल्या आहेत. त्यामुळे त्या काय भुमिका घेतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. जे जयललिता यांचे डिसेंबर 2016 मध्ये निधन झाले. यानंतर एआयएडीएमकेमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. अन्नाद्रमुकच्या पन्नेरसेल्वम गटाने शशिकला यांना पक्षातून काढून टाकले होते.
तामीळी राजकारणात मोठी घडामोड; शशीकला यांचा राजकीय संन्यास

shashikala vk