Site icon कार्यारंभ लाईव्ह

राममंदिराचा निधी डान्सबारवर उडवला जातोय का?

nana patole

nana patole

मुंबई, दि. 4 : राम मंदिरासाठी जमा केलेला निधी कोणी डान्सबार किंवा बियरबारमध्ये उडवत असेल तर त्याचा हिशोब मागितलाच पाहिजे. मी 30 वर्षांपूर्वी राम मंदिराला निधी दिला त्याच काय झालं? हे विचारण्याचा मला अधिकार आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

राम मंदिर उभारणीसाठी जनतेकडून निधीचं संकलन करण्यात आलं आहे. या मोहिमेत प्रत्येक घटकातील लोकांनी योगदान दिलं आहे. दरम्यान काँग्रेसकडून या निधी संकलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका नेत्यानेही राम मंदिराच्या नावावर जमा केलेल्या निधीचा उपयोग दारू पिण्यासाठी केल्याचा धक्कादायक आरोप केला होता. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला होता. कांतीलाल भूरिया हे मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते आहेत. ते युपीए 2 सरकारच्या राजवटीमध्ये केंद्रीय मंत्री होते. तसंच ते झाबुआमधून पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना भूरिया म्हणाले की भाजपा नेते राम मंदिराच्या नावाखाली लोकांकडून निधी गोळा करतात आणि रात्री याच पैशांंमधून दारु पितात. त्यांच्या या आरोपाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Exit mobile version