Site icon कार्यारंभ लाईव्ह

आजही कोरोना शतकपार

बीड : जिल्ह्यात बुधवारी तब्बल 110 कोरोना रूग्णांची भर पडली आहे. रूग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनची टांगती तलवार आता जिल्ह्यावर आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 1 हजार 63 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 110 अहवाल पॉझिटिव्ह तर 953 अहवाल निगेटिव्ह आहेत. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 57 तर अंबाजोगाई 10, आष्टी 11, धारूर 1, गेवराई 5, केज 4, माजलगाव 13, परळी 4, पाटोदा 2, शिरूर 1, वडवणी 2 असे एकूण 89 पॉझिटिव्ह आले आहेत.

आज व्यापार्‍यांच्या चाचण्या सुरु
बीडमध्ये आज व्यापार्‍यांच्या कोरोना चाचणी सुरु करण्यात आल्या आहेत. त्यांचे अहवाल सायंकाळपर्यंत येतील. त्यानंतर कोरोना रूग्ण संख्येत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

Exit mobile version