Site icon कार्यारंभ लाईव्ह

नाथषष्ठी उत्सवासाठी मानाच्या 20 मानकर्‍यांना परवानगी

nath shashthi baithak

nath shashthi baithak

पैठण दि. 25 : कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व नियम पाळून पैठण येथील शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी पारंपारिक उत्सवासाठी इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे 20 मानकर्‍यांना गुरुवारी परवानगी दिली. उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी ही दिली. या बैठकीस पोलीस उपअधीक्षक गोरख भामरे यांची उपस्थिती होती.

पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी पारंपारिक तीन दिवसाच्या उत्सवाला तुकाराम बीजपासून प्रारंभ होत असतो. कोरोना साथीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यात्रा उत्सव रद्द करून पारंपारिक कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती. परंतु इतर देवस्थानाप्रमाणेच नाथषष्ठी पारंपारिक उत्सवामध्ये कमीत कमी 20 मानकर यांना पारंपारिक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात गुरुवारी सायंकाळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नाथवंशज यांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयात पार पडली. पारंपारिक उत्सव साजरा करण्यासाठी मानकर्‍यांनी प्रशासनाला सहकार्य करण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी मोरे यांनी आवाहन केले. पारंपारिक सोहळ्यासाठी कमीत कमी 20 मानकर यांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, गोपनीय शाखेचे गणेश शर्मा यांच्यासह विश्वस्त मंडळाचे व नगर परिषद, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version