Site icon कार्यारंभ लाईव्ह

‘ही’ दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत उघडता येणार

kirana dukan

kirana dukan

बीड जिल्हाधिकार्‍यांचे नवे आदेश

बीड : जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील आणखी काही दुकाने उद्यापासून उघडण्यास जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी मुभा दिली आहे. याबाबतचे आदेश रविवारी जारी करण्यात आले आहेत.

  आदेशात म्हटल्याप्रमाणे, जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, मांसाहाराची दुकाने, बेकरी हे सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. तसेच, केवळ हातगाड्यावर फिरून फळांची विक्री सायंकाळी 5 ते 7 करता येणार आहेत आहे. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात उद्यापासून होत आहे.

Exit mobile version