Site icon कार्यारंभ लाईव्ह

मोकाट फिरणारे 43 जण सापडले कोरोना पॉझिटिव्ह

antigen test

antigen test

बीड, दि. 3 : बीड आणि अंबाजोगाई शहरात आज रस्त्यावरच आरोग्य विभागाने अ‍ॅन्टीजेन तपासणी केंद्र सुरु केली होती. पोलीसांच्या मदतीने या केंद्रात 710 जणांची दिवसभर तपासणी करण्यात आली. यात 43 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

रस्त्यावरील गर्दीत सुपर स्प्रेडर असू शकतात, असा आरोग्य विभागाचा संशय होता. त्यामुळे गर्दी कमी करणे आणि या सुपर स्प्रेडर लोकांना रोखणे यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीन आरोग्य विभागाने बीड आणि अंबाजोगाई शहरात 13 ठिकाणी तपासणी कॅम्प लावले होते. यात आज दिवसभर 710 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात 43 जण पॉझिटिव्ह आढळून आले. आज रस्त्यावर करत असलेल्या तपासणीमुळे गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर घटली होती.
खालील तपासणी केंद्रावर आढळले हे रुग्ण

Exit mobile version