Site icon कार्यारंभ लाईव्ह

आजचा इतका कमी आकडा बघून तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल

corona

corona

बीड : जिल्ह्यात मंगळवारी (दि.१) कोरोनाचे ३६१ रुग्ण आढळून आले आहेत. जवळपास सर्वच तालुक्यातील संसर्ग कमी होताना दिसून येत आहे.

जिल्ह्यातून सोमवारी ३७९१ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.१) प्राप्त झाले, त्यामध्ये ३६१ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३४३० नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ७०, अंबाजोगाई ३०, आष्टी ६०, धारूर १७, गेवराई २४, केज ४४, माजलगाव २९, परळी १२, पाटोदा ३९, शिरूर २८ तर वडवणी तालुक्यात १८ रुग्ण आढळून आले. दरम्यान, प्रतिदिवस आढळणारी रुग्णसंख्या दीड हजारांवरून ३०० च्या घरात आली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version