Site icon कार्यारंभ लाईव्ह

घरात घुसून विवाहित महिलेवर बलात्कार

atyachar

atyachar

नेकनूरमध्ये घडली घटना आरोपींवर गुन्हा दाखल

नेकनूर : नेकनूर येथील 25 वर्षीय महिला घरामध्ये झोपली असता एका आरोपीने घरात घुसून सदरील महिलेच्या पतीस व मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील आरोपी फरार झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये महिला – मुलींवरील अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे .

नेकनूर येथील 25 वर्षीय महिला रात्री घरामध्ये झोपली असता अविनाश लक्ष्मण पारसे (रा. झोपडपट्टी नेकनूर) हा घरामध्ये घुसला. त्याने महिलेच्या पतीला व मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. सदरील प्रकार महिलेने आपल्या घरच्या लोकांना सांगितल्यानंतर या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आरोपी अविनाश पारसे याच्या विरोधात कलम 376, 452, 506 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पिंक पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कोळी या करत आहेत.

Exit mobile version