Site icon कार्यारंभ लाईव्ह

गावाकडे सुट्टीवर आलेल्या एसआरपीच्या जवानाला लुटले!

mobile chor, mobile chori

mobile chor, mobile chori


केज दि.10 : पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात कार्यरत असलेले जवान हे गावाकडे सुट्टीवर आलेले असताना ते व त्यांची पत्नी हे दोघे स्कुटी वरून जात असताना त्यांना केज – बीड रोडवरील सावंतवाडी पाटी टोल नाक्याजवळ तीन चोरट्यांनी दुचाकी आडवी लावून मारहाण केली. तसेच गळ्यातील सोने, मोबाईल व रोख रक्कम पळविली असल्याची घटना घडली आहे.

केज तालुक्यातील सांगवी येथील सोमेश गोरख धस हे पुणे येथे राज्य राखीव दलात शिपाई या पदावर कार्यरत आहेत. ते चार दिवसापूर्वी त्यांच्या मेव्हणीच्या लग्नासाठी गावी आले होते. दि. 9 ऑगस्ट रोजी सोमेश धस व त्यांची पत्नी हे दोघे त्यांच्या स्कुटी गाडीवरून सांगवी (सारणी) येथुन केजकडे येत असताना रात्री 8.15 वा. च्या सुमारास बीड-केज महामार्गा वरील सावंतवाडी टोलनाक्या जवळ येत पाठीमागुन एका मोटार सायकलवर तीन ईसम आले. त्यांनी सोमेश धस व त्यांची पत्नी यांच्या स्कूटीला मोटार सायकल आडवी लावली. त्या नंतर स्कुटी उभी केली असता त्या तीन ईसमा पैकी एकाने त्यांच्या स्कुटीची चावी काढून घेतली. इतर दोघांनी त्याच्या पत्नीला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ते पाहून सोमेश त्यांना प्रतीकार करु लागले तेव्हा एकाने सोमेश च्या हाताला व करंगळीला, छातीला जोराचा चावा घेतला. तेव्हा तीघांनी पोलीस जवान सोमेश धस यांना मारहाण करीत त्यांच्या पत्नीजवळील सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असे एकूण 84 हजार 600 रुपयांचा ऐवज पळविला. या प्रकरणी सोमेश धस यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गु. र. नं. 389/2021 भा. दं. वि. 394 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रोड रॉबरीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत.घटनेची माहिती मिळताच प्रभारी डीवायएसपी श्री. लगारे, पोलीस निरीक्षक मिसळे, डीबी पथकाचे दिलीप गित्ते यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच उस्मानाबाद येथील श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

Exit mobile version