Site icon कार्यारंभ लाईव्ह

धारुर येथील किल्ला परिसरात मृतदेह आढळला

DEATH BODY

DEATH BODY

धारुर दि.28 : येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या बाजूला असणार्‍या लाला खडक परिसरात सोमवारी (दि.28) सकाळी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. यामुळे खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेत घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धारूर शहरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या बाजूला लाला खडक नावाचा परिसर आहे. या ठिकाणी सोमवारी सकाळी परिसरातील नागरिकांना एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती पोलीसांना दिल्यानंतर धारुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिसाळ, उपनिरीक्षक संतोष भालेराव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. हा अहवाल आल्यानंतर नेमकी घटना कशामुळे घडली हे समोर येईल असे पोलीसांनी सांगितले. सदरील मृतदेह हा धारुर येथीलच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Exit mobile version