Site icon कार्यारंभ लाईव्ह

साडेचारशे ब्रासचा वाळूसाठा पुन्हा नदीत ढकला

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश; राज्यातील पहिलीच कारवाई

बीड : आ.लक्ष्मण पवार यांच्यासह ग्रामस्थांच्या आंदोलनांमुळे गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील वाळूघाट चर्चेत होता. आता पुन्हा एकदा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशामुळे हा वाळूघाट चर्चे आला आहे. कंत्राटदाराने केलेला साडेचारशे ब्रासचा वाळूसाठा पुन्हा नदीत ढकलण्याचा अनोखा आदेश बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

  गंगावाडी येथील वाळूघाट प्रकरणी आ. लक्ष्मण पवार यांनी ग्रामस्थांसह नदीपात्रात उतरुन सदर वाळूठेका जप्त करण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळू उपश्यातील खातरजमा करण्यासाठी समिती नेमली होती. यावेळी कंत्राटदाराने नेमून दिलेल्या ठिकाणाऐवजी इतर ठिकाणाहून साडेचारशे ब्रास वाळू साठे केल्याचे समोर आले होते. आता सदरची वाळू त्या ठिकाणाहून हलविण्याचे शक्य नसल्याचे सांगत ही वाळू पुन्हा नदीपात्रात ढकलण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत. गंगावाडीचा वाळू ठेका रद्द करण्यासाठी आ.लक्ष्मण पवार आक्रमक झाले होते. याच अनुषंगाने वाळूसाठा पुन्हा नदीत ढकलण्याचे आदेश दिले आहेत. वाळूच्या अवैध उपश्यासंदर्भात वाळूसाठा नदीत ढकलण्याची कारवाई जिल्ह्यात नवे तर राज्यात पहिल्यांदाच होत असावी.

Exit mobile version