मुंबई : बॉलिवूडचा उमदा कलाकार सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही सुशांतच्या आत्महत्येबाबत शोक व्यक्त केला आहे.
मुंडे यांनी लिहीलेल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे, टीव्ही सीरिअल ते महेंद्रसिंह धोनीचा यशस्वी बायोपिक असा लोकप्रियतेचा कळस गाठणारा प्रवास करणारा हरहुन्नरी कलाकार आत्महत्येसारखे पाऊल उचलतो हे अनाकलनीय आहे असं म्हणत धनंजय मुंडे यांनी सुशांतसिंग राजपूत याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सुशांत जाण्याने चित्रपट सृष्टीचं नुकसान झालं असल्याची प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे. सुशांत सिंग राजपूत गेला आहे हे वृत्त कळताच मला धक्का बसला आहे. परमेश्वर हे दु:ख सहन करण्याची शक्ती सुशांतच्या कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रांना आणि त्याच्या करोडो फॅन्सना देवो, अशी मी प्रार्थना करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.