Site icon कार्यारंभ लाईव्ह

ऊसतोड मजुराचा मुलगा संतोष खाडे SANTOSH KHADE एनटीडी प्रवर्गातून एमपीएससीत प्रथम

SANTOSH KHADE

SANTOSH KHADE

बीड, दि.1 : एमपीएससी मार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील ऊसतोड मजुराचा मुलगा संतोष अजिनाथ खाडे यांनी एनटीडी प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यश मिळविल्यानंतर संतोष अजिनाथ खाडे याने फेसबूक पोस्ट लिहीत आपलं हे यश आई वडीलांच्या कष्टाचं चीज असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या शिवाय मी शुन्य आहे. आई आणि बापुचं उभं आयुष्य माझ्यासाठी कष्ट करण्यात गेलंय. तेव्हा मी कुठे इथपर्यंत पोहोचलोय. एका ऊसतोड कामगाराच्या मागे भक्कमपणे उभे राहीलेलं माझं सावरगाव घाट हे गाव या गावाला मी कधीच विसरू शकत नसल्याचे संतोष खाडे याने म्हटले आहे.

Exit mobile version