Site icon कार्यारंभ लाईव्ह

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!


सिरसाळा दि.1 : सततच्या नापिकीला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना धारूर तालुक्यातील कुंडी येथे मंगळवारी (दि.1) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

रंगनाथ छत्रभुज काळे (वय 31 रा.कुंडी ता.धारुर) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी पहाटे जनावराच्या गोठ्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत रंगनाथ यांचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे, पंचनामा करून मृतदेह सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात शविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान सतत चनापिकेला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Exit mobile version