Site icon कार्यारंभ लाईव्ह

लाज सोडली : बीडमध्येपुन्हा एक लाचखोर पकडला!

बीड दि. 7 : बीड जिल्ह्यात लाचखोरांची संख्या आहे तरी किती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मागील 15 दिवसात तब्बल 11 लाचखोर एसीबीने पकडले, त्यानंतर आज पुन्हा एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. या सततच्या कारवायामुळे बीड जिल्हा लाचखोरांचा जिल्हा घोषित करण्याची वेळ आली आहे.

केज तालुक्यातील एका संस्थेतील सोनवणे नामक मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याकडे दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने विद्यार्थ्याने बीड एसीबीकडे तक्रार केली. सापळा लावल्यानंतर तीन हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असून लाचखोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने जिल्ह्यातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख युनूस, श्रीराम गिराम आदींनी केली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Exit mobile version