Site icon कार्यारंभ लाईव्ह

हुक्का पार्लरवरील छाप्यात प्रतिष्ठीत कुटुंबातील मुला-मुलींना पकडले

hukka party

बड्या घरच्या मुलींचाही समावेश

लॉकडाऊनच्या काळात श्रीमंतांच्या मुला-मुलींसाठी सुरु असलेल्या आरणगाव शिवारातील एका फुड लॅन्डमधील हुक्कापार्लरवर पोलीसांनी छापा मारला. छाप्यात नगरमधील प्रतिष्ठीतांच्या मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नगर शहरातील नगर-दौंड रस्त्यावर हा हुक्का पार्लर सुरु होता. पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील एका पथकाने संबंधीत हुक्का पार्लरवर रविवारी रात्री छापा घालत श्रेयस संजय कोठारी (वय 28, बुरुडगाव रोड), अभिषेक अदाके संचेती (वय 30, बुरुडगाव रोड), आदित्य सतीश इंदाणी (वय 30, रा.महेश टॉकीजमागे), मोहीत कृष्णाकांत शहा (वय 26, खिस्त गल्ली), अंकित महेश लुणिया (वय 30, रा. माळीवाडा), अंकित अमृतलाल कोठारी (वय 28, रा. वसंत टाकीज), घनश्याम बारकू ठोकळ (वय 40, रा. समर्थनगर), किसन छगनराव निकम (वय 39, रा. बुरुडगाव रोड), गणेश संजय डहाळे (वय 24, रा. तोफखाना), रोहित नितीन शहा (वय 23, रा. खिस्त गल्ली), दीपक जितेंद्र गिडवानी (वय 23, रा. शिलाविहार), यश कन्हैयालाल लुभिया (वय 23, रा. मिस्कीननगर), आदित्य गोरख घालमे (वय 25, रा. गुजरगल्ली), करण विजय गुप्ता (वय 24, रा. गंजबाजार), किसन चंद्रकुमार माखिजा (वय 25, सारसनगर) हॉटेल व्यवस्थापक अरुण बाबासाहेब ढमढेरे यासह 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर हॉटेलमालक सतीश किसन लोटके हा फरार आहे. पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर खिळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक डी.आर. जारवाल करीत आहेत. पोलिसांनी प्रतिबंंधात्मक कारवाई करीत आरोपींची जामिनावर मुक्तता केली.

बड्या घरच्या मुलींचाही समावेश
हुक्का पार्लरवर छापा घातला त्यावेळी नगरमधील प्रतिष्ठीत कुटुंबातील मुलीही आढळून आल्या. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. लॉकडाऊनमध्ये या मुला-मुलींसाठी हुक्का पार्लर सुरु असल्याने ही मुलं-मुली हुक्क्यासाठी किती चटावलेली होती हे दिसून येते.

Exit mobile version