Site icon कार्यारंभ लाईव्ह

भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक

india vs china

पूर्व लडाख : भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या सीमासंघर्षावर हरएक तर्‍हेने मार्ग काढण्याचा प्रयत्न आता दोन्ही देश करताना दिसत आहेत. आता कूटनीतीच्या माध्यमातून तोडगा निघावा यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. आज डब्ल्यूएमसीसीची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. पूर्व लडाखमध्ये चार ठिकाणी संघर्षाची स्थिती आहे, त्यातून कसा तोडगा काढायचा या विषयी बैठकीत चर्चा होईल.

22 जून रोजी भारत आणि चिनी लष्कराच्या अधिकार्‍यांमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. यामध्ये सैन्य मागे घेण्यासंदर्भात दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाले. चीनच्या प्रवक्त्याने सीमेवर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

लष्करी अधिकार्‍यांमध्ये प्रत्येक वादाच्या मुद्दावर चर्चा झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी तणाव कमी करायचे ठरवले आहे. आता संयुक्त सचिव उच्च स्तरावरील लष्करी चर्चा पुढे नेईल. भारतीय अधिकारी नकाशे, जुन्या कराराच्या कागदपत्रांच्या आधारे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा भारतीय प्रदेशांवरील दावा कसा चुकीचा आहे, ते पटवून देण्याचा प्रयत्न करतील.


Exit mobile version