Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड शहरातील संचारबंदी उठवली, आता काही भाग बंद!

beed lock down

beed lock down

बीड, दि. 9 : बीड शहरात लागू असलेली संचारबंदी आज उठविण्यात आली आहे. आता संपूर्ण शहराऐवजी काही भागात संचारबंदी असणार आहे. त्यानुसार बीड शहरात ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे.

त्यामध्ये इंद्रप्रस्थ कॉलनी (शेख महमूद शेख मसूद यांच्या घरापासून ते शेख ताजोद्दीन यांच्या घरापर्यंत), आसेफनगर (सय्यद सिराजोद्दीन सय्यद खुदबुद्दीन यांच्या घरापासून ते शेख मतीन महंमद उस्मान यांच्या घरापर्यंत), बीड मामला (आयशा किराणा ते अब्दूल मुजीब अब्दूल वाहेब मोमीन यांच्या घरापर्यंत, औटी गल्ली (थिगळे गल्ली जवळ) (अखिलोद्दीन सरदार इनामदार यांच्या घरापासून ते विशाल विजयकुमार थिगळे यांच्या घरापर्यंत), पांडे गल्ली (बालाजी मंदिर जवळ)(गणेश मदनराव बलदवा यांच्या घरापासून ते बाबुराव माणिकराव धायगुडे यांच्या घरापर्यंत, डी.पी रोड बीएसएनएल ऑफिसजवळ (बारकूल हॉस्पिटल ते अदिनाथ नवले यांचे घर), परवाना नगर खंडेश्वरी रोड (महारुद्र नागनाथअप्पा माढेकर यांचे घर ते दत्त मंदिर पर्यंत), विद्या नगर पश्चिम (घुमरे कॉम्पलॅक्स), गोविंद नगर (बळीराजा कॉम्प्लेक्स ते गोपाळ आपर्टमेंट), मोमीनपुरा(सागर कटपीस सेंटर ते फातेमा बूक डेपो), राजुरीवेस ते कोतवाली वेस व आजुबाजुचा परिसर (कारंजा, अजिजपुरा, बलभीम चौक, छोटी राज गल्ली, काळेगल्ली, जुनाबाजार) आता कंटेन्मेंट झोन असणार आहे.

Exit mobile version