Site icon कार्यारंभ लाईव्ह

‘संत एकनाथ’चे चेअरमन तुषार शिसोदे यांच्या विरोधात तक्रार

sant eknath sahkari sakhar karkhana paithan

sant eknath sahkari sakhar karkhana paithan

अपात्र करण्याची ऊस उत्पादक सभासदाची मागणी

पैठण, दि.18 : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी संचालक मंडळाची मासिक सभा घेता वेळेस सहकार उपविधीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी मागणी ऊस उत्पादक सभासद दीपक मोरे यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे केली आहे.

पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यामधील अनागोंदी कारभार व नियमबाह्य पद्धतीने चेअरमन तुषार शिसोदे यांनी आपला मनमानी कारभार करून संचालक मंडळाच्या मासिक बैठकी घेतेवेळेस कमीत कमी दोन महिन्याच्या अंतरावर बैठक सभा घेणे बंधनकारक आहे. मात्र चार महिन्यांच्या अंतरावर मनमानी पद्धतीने संचालक मंडळाच्या बैठकी घेण्यात आल्या. त्यामुळेमहाराष्ट्र सहकार अधिनियम कायदा कलम 32, अनुसार उपविधीचे उल्लंघन केल्यामुळे चेअरमन सिसोदे यांना तात्काळ अपात्र ठरवण्याची मागणी ऊस उत्पादक सभासद दीपक देवीचंद मोरे यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे केले आहे.

Exit mobile version