Site icon कार्यारंभ लाईव्ह

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

मुलगा अभिजीत यांनी ट्विटरवरुन दिली माहिती

मुंबई  : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं सोमवारी (दि.31) सायंकाळी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असताना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

      राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावलं. त्यांचा मृत्यू एका युगाचा अंत आहे. प्रणव मुखर्जी यांचे कुटुंबीय, मित्र आणि सर्व देशवासियांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम होता. 5 दशकांच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात, अनेक उच्च पदांवर असूनही ते नेहमीच जमिनीशी जोडले गेले. त्यांच्या सभ्य आणि मनमिळावू स्वभावामुळे ते राजकीय क्षेत्रात लोकप्रिय होते.

Exit mobile version