Site icon कार्यारंभ लाईव्ह

टँकर पलटी; चालक जागीच ठार

accident

कोळवाडी परिसरातील घटना

बीड  : सिमेंट केमिकल घेवून जाणार्‍या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅकर रस्त्यावर पलटी झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मांजरसुंबा घाटाच्याखाली कोळवाडी परिसरात बुधवारी (दि.2) घडली.
सोलापूरहून औरंगाबादकडे सिमेंट केमिकल घेवून येणारा टॅकर (के.ए.32 बी.7672) चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्ग पोलीस पोलीस उपनिरीक्षक गित्ते,अल्ताफ शेख, जाधवर, म्हेत्रे, ठोंबरे, वनवे, सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेह टँकरच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होवू नये म्हणून टँकर रस्त्याच्या बाजुला घेण्यास चालू असल्याचे पोउपनि.गित्ते यांनी सांगितले.

Exit mobile version