Site icon कार्यारंभ लाईव्ह

मूग, उडीद आधारभूत खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु

mug udid kharedi

mug udid kharedi

बीड : सन 2020-21 हंगामामध्ये बीड जिह्यात मूग व उडीद या पिकाची ऑनलाईन नोंदणी दिनांक 15 सप्टेंबर 2020 पासून शासनाच्या आदेशानूसार नोंदणी सुरु करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. तरी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जावून ऑनलाईन नोंदणी करावी.

नोंदणीसाठी आपले आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे छापील पासबूक (अकाऊंट नंबर व आयएफसी कोड स्पष्ट दिसावा) ऑनलाईन पीक पेरा असलेला सातबारा उतारा घेऊन आपल्या पिकाची नोंदणी करावी. आधारभूत किंमतनुनसार मूग रु.7 हजार 196 हजार प्रती क्विंटल व उडीद 6 हजार रुपये प्रती क्विंटल असणार आहे. बीड, गेवराई, माजलगाव, परळी, धारुर, फूलसावंगी, शिरुर, पाटोदा, कडा, मंगरुळ, शिरवळ, अंबाजोगाई, घाटनांदूर, बर्दापूर येथे आधारभूत नोंदणी करीता खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

Exit mobile version