Site icon कार्यारंभ लाईव्ह

‘त्या’ नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे मुख्य वनरक्षक अधिकाऱ्यांचे आदेश

bibtya halla

bibtya halla

आ. सुरेश धस यांनी केली होती मागणी

आष्टी : तालुक्यासह काही भागात नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काहींना जखमी केले आहे. त्यामुळे त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मुख्य वनरक्षक अधिकारी नितीन काकोडकर यांनी रविवारी रात्री दिले.

नरभक्षक बिबट्या पुन्हा मानवी जीवितावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 11(1) (क) नुसार मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या अनुसूची -1 मधील वन्य प्राण्यास जेल बंद करणे, बेशुद्ध करणे अथवा ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी मुख्य वन संरक्षक अधिकारी मुख्य कार्यालय नागपूर यांच्यासह मुख्य वनसंरक्षक कार्यालय औरंगाबाद तसेच विभागीय वन अधिकारी बीड यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. सध्या परवानगी मिळाली असून नरभक्षक बिबट्याने पाथर्डी तालुक्यात दोन आष्टी तालुक्यात तीन व करमाळा तालुक्यात 2 असे एकूण जणांना आपली शिकार बनवली आहे. त्या बिबट्याला ठार मारण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपण वनविभाला पत्रद्वारे मागणी केली होती. आणि आज ती मागणी मान्य केली त्यामुळे आता बिबट्याला शक्य झालं तर बेशुध्द करून जेरबंद करा किंवा ठार मारा पण शेतकऱ्यांना आता मोकळा श्वास घेऊ द्या, असे आमदार सुरेश धस म्हणाले.

Exit mobile version