बीड दि.19 : महिनाभरापासून बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या बदलीची चर्चा होती. अखेर त्यांची बदली करण्यात आली असून बीड येथे सध्या औरंगाबादला सहायक विक्रीकर आयूक्त म्हणून कार्यरत असलेले आर.एस. जगताप हे जिल्हाधिकारी म्हणून येणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता शिथील होताच राहुल रेखावार यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. राहुल रेखावार यांना विक्रीकर विभागाच्या आयूक्तपदी मुंबई येथे नियूक्ती देण्यात आली आहे. तर आर.एस.जगताप हे बीडचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. जगताप यांनी यापूर्वी बीड जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली

rahul rekhawar