Site icon कार्यारंभ लाईव्ह

मुख्याधिकाऱ्यांना डीपीसीच्या बैठकीतून हाकलले; निलंबनाची कारवाई प्रस्तावित

beed co

पालकमंत्र्यांचे आदेश; माहिती न देणे अंगलट
बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अध्यक्षस्थानी असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी मंगळवारी (दि.२) अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यावेळी माहिती सादर न करणाऱ्या बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी चांगलाच दणका दिला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी सर्व विभागांकडून विविध विषयांची माहिती मागवून घेण्यात येते. याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे यांना नगरपालिकेतील विविध विकासकामे, योजनांची माहिती मागविण्यात आली होती. परंतू त्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे हे संतापले आणि त्यांनी गुट्टे यांना सभागृहाबाहेर हाकलले. त्यांच्याविरोधात कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, ही कारवाई झाल्यास प्रशासनातील कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण होईल.

Exit mobile version