Site icon कार्यारंभ लाईव्ह

एकाच चितेवर आठ जणांना अग्निडाग!

CORONA DEATH

कोरोना बाधितांबरोबर मृतांचा आकडाही वाढू लागला
अंबाजोगाई दि.6 : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा हा सातशेच्या पुढे पोहचला आहे. तसेच मृतांची संख्याही वाढतांना दिसत आहे. मंगळवारी (दि.6) स्वाराती रुग्णालयात सात व लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्निडाग देण्यात आला.
अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय व लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये परळी, केज, धारूर, गंगाखेड, माजलगाव आदी तालुक्यातील रुग्ण कोरोनावरील उपचारासाठी येतात. अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. सोमवारी मंगळवार पेठ, भटगल्ली, बोरखेड (परळी), लोखणी दावारागाव, अंबलटेक, आपेगाव, मंगरूळ (माजलगाव) व धारूर या आठ गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. मृत पावलेल्या रुग्णावर मंगळवारी दुपारी पठाण मांडवा रस्त्यावरील पालिकने निर्माण केलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग देण्यात आला. यामध्ये एक महिला असून सर्व रुग्ण 60 वर्षापुढील आहेत. दरम्यान, दुपारी घाटनांदूर येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Exit mobile version