Site icon कार्यारंभ लाईव्ह

नारायण राणेंच्या बॅनरला चप्पलने मारले; पोलिसात तक्रार

माजलगावात शिवसैनिकांनी केला निषेध

माजलगाव : मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी येथील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या बॅनरला चप्पल, बुटाने मारुन निषेध व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज (दि.२४) हे आंदोलन करण्यात आले.

जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, दासू बादाडे, तुकाराम येवले, दत्ता रांजवण, आशोक आळणे, बाळासाहेब मेंडके, अमोल डाके, विठ्ठल जाधव, नामदेव सोजे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शिवसैनिकांनी शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन अपशब्द वापरणाऱ्या नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.

Exit mobile version