Site icon कार्यारंभ लाईव्ह

सुभाष सारडांच्या द्वारकादास मंत्री बँकेवर प्रशासक

subhash sarda

subhash sarda

बीड, दि.25 : बीड जिल्ह्याला आर्थिक क्षेत्रात पुन्हा एकदा जोरदार हादरा बसला आहे. येथील द्वारकादास मंत्री बँकेत 2019-20 मध्ये झालेल्या प्रशासकीय अनियमततेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने राज्याच्या सहकार विभागाला आदेश देत बँकेवर प्रशासक नेमण्याची सुचना केली. त्यानुसार सहकार आयुक्तांच्या आदेशाने बीडचे जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आली. देशमुख यांनी पदभार देखील स्विकारला असून ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये, असे अवाहन देखील त्यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना केले.

सुभाष सारडा हे या बँकेचे सर्वेसर्वा होते. ते मागील अनेक वर्षे बीड जिल्हा बँकेवर देखील चेअरमन म्हणून राहीलेले आहेत. मात्र त्यांच्याच कार्यकाळात बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्याने हा त्यांच्यासाठी आणि एकूणच बीड जिल्ह्याच्या आर्थिक क्षेत्राला मोठा झटका मानला जात आहे.

ठेवीदारांनी काळजी करू नये- प्रशासक विश्वास देशमुख
रिझर्व्ह बँकेने प्रशासक नियुक्तीची कारवाई ही प्रशासकीय अनियमिततांमुळे केली आहे. मागच्या वर्षी बँकेच्या तपासणीत अनियमितता आढळून आलेली होती. बँकेच्या व्यवहारात झालेल्या प्रशासकीय अनियमितता लवकरच दूर केल्या जातील. बँकेची परिस्थिती उत्तम आहे. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. लवकरच बँकेवर पुन्हा लोकनियुक्त संचालक मंडळ येईल, अशी प्रतिक्रिया प्रशासक विश्वास देशमुख यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना व्यक्त केली आहे.

दरम्यान यावर बोलताना बँकेचे व्यवस्थापक आर.जी.सोनी कार्यारंभशी बोलताना म्हणाले, बँकेत काहीही गैरप्रकार झालेले नाहीत. केवळ बँकेत अनियमितता आहे. पाच ते सहा महिन्यात ही अनियमितता प्रशासकांच्या मार्गदर्शनात दुरुस्त करण्यात येतील. बँकेची आर्थिक परिस्थिती अतिउत्तम आहे. त्यामुळे ठेविदारांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे अवाहन सोनी यांनी केले आहे.

बँक अतिशय चांगली – चेअरमन सुभाष सारडा
बँकेवर प्रशासक आल्याचे मला साधे पत्र देखील नाही. माझ्या बोर्डाला देखील तसे पत्र नाही. जोपर्यंत मला अधिकृत कळवले जात नाही तोपर्यंत मी त्यावर भाष्य करू शकत नाही. बँकेत काय झालं हे अद्याप मला माहिती नाही. बँक चालू वर्षी साडेसात कोटी रुपयांनी नफ्यात आलेली आहे. आजही बँकेत 296 कोटीचे डिपॉझिट आहे. सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 130 कोटी रुपये इतर बँकेत ठेवलेले आहेत. 45 टक्के पैसे बँकेत पडून आहेत. त्यामुळे कर्जाला उठाव नाही म्हणून बँकेने डिपॉझिटचे रेट कमी केले होते. त्यामुळे बँकेची परिस्थिती अतिउत्तम आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, असे अवाहन देखील बँकेचे चेअरमन सुभाष सारडा यांनी केले आहे.

काय झाले होते बँकेच्या कारभारावर आरोप?

राका यांनी या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली होती, पोलीसांनी त्यांचा जवाब देखील घेतलेला आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता. हा सर्व घोटाळा जवळपास 425 कोटी रूपयांचा असून, याची चौकशी ईडीने करावी, अशी मागणी देखील राका यांनी केलेली होती.

ह्या आरोपांचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच आज अचानक रिझर्व्ह बँकेने सहकार आयुक्तांना आदेश देत बँकेवर तातडीने प्रशासक नेमण्यात यावा, असे आदेश दिले. त्यानंतर बँकेवर प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. देशमुख यांनी दुपारी दोनच्या सुमारास बँकेत दाखल होत सहकार आयुक्तांचे आदेश दाखवत कारभार स्विकारला.

Exit mobile version