Site icon कार्यारंभ लाईव्ह

ओबीसी प्रवर्ग वगळून निवडणूक होणार!

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. कालच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना आरक्षण देता येणार नाही असे म्हटले होते.

राज्यातील 106 नगरपंचायत मध्ये 1802 जागांसाठी निवडणूक होणार होती. आता त्यापैकी ओबीसींच्या 400 जागांच्या निवडणुकीला स्थगिती मिळणार आहे. बीड जिल्ह्यात आष्टी, शिरूर, पाटोदा, केज, वडवणी येथे निवडणूक पार पडत आहे. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

Exit mobile version